मुंबई: महाराष्ट्रात करोना रुग्णांचा आकडा वाढत असून काल यात ४३१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं ही संख्या ५६४९ वर पोहोचली आहे. मात्र, रुग्ण दुपटीनं वाढण्याचा वेग मंदावला असल्यानं घाबरून जाण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊया दिवसभरातील ताज्या घडामोडी...
लाइव्ह अपडेट्स:
>> कोल्हापूर: आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सीपीआरसह ७ ठिकाणी औषध फवारणी पंपांचे वाटप
>> नागपूर: सतरंजीपुरा येथील ८० जणांचं विलगीकरण... हिंगणा मार्गावरील वानाडोंगरी येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ठेवणार
>> महाराष्ट्रातील करोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर; राजेश टोपे यांची माहिती
>> पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीचा मजला क्वारंटाइनसाठी देण्याचा व्यवस्थापनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयानं स्वीकारला
>> अहमदनगर: संगमनेर येथे आढळले चार करोना बाधित रुग्ण. जिल्ह्यातील संख्या झाली ३७
>> औरंगाबाद: सॅनिटायजरची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषधी विभागाची सिल्लेखाना चौकातील औषधी दुकानात चौकशी. कारवाई होण्याची शक्यता

>> अहमदनगर: जामखेड येथील सर्व दुकाने, आस्थापना, अस्तावश्यक सेवेची दुकाने ६ मे पर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आदेश
>> अहमदनगरः लॉकडाउनची मुदत संपल्यानंतरही जामखेड राहणार बंद. जामखेड शहरात काल आणखी दोन रुग्ण सापडले असल्यामुळे प्रशासनाची खबरदारी
>> अहमदनगर: लॉकडाउनचा गैरफायदा उठवत दरोडा टाकण्यासाठी निघालेली दरोडेखोरांची टोळी जेरबंद. नगर-पुणे महामार्गावर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. अट्टल दरोडेखोर लंगड्या अंकुश काळे याच्यासह साथीदारांना अटक
>> जळगावमध्ये ७३ वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर आलेला करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ६
>> नाशिक: मालेगावात करोनाबाधित रुग्णांची शंभरी. आणखी पाच निघाले पॉझिटिव्ह. सर्वजण बाधितांचे नातलग
>> मंबईत आजपासून संशयितांना संस्थात्मक क्वारंटाईन केलं जाणार, शाळांमध्ये खाटा टाकून व्यवस्था केली जाणार